0
SKU: WLPMAR ,

पाळकामध्ये काय पाहावे

लेखक: ब्रायन बीडबाक
अनुवाद: क्रॉसी उर्टेकर

पाळकाचा शोध घेणाऱ्या समितीसाठी मार्गदर्शक पुस्तक

मंडळीच्या जीवनामध्ये योग्य पाळक शोधणे हा निर्णायक समय असतो. परंतु बहुतेक मंडळ्या यासाठी अननुभवी व अजाण पुलपिट समितीवर अवलंबून राहतात. बहुतेक वेळा असे करणे आपल्या उमेदवारांच्या निवडीबाबत जुगार खेळल्यासारखे ठरते कारण त्यांना पाळक निवडीबाबत बायबलचे असलेले निकष ठाऊक नसतात.

मग मंडळीने आपल्या पुलपिटसाठी योग्य मनुष्य कसा शोधावा? ह्या पुस्तकाची मांडणी करताना पाळक शोध समितीला मदत करण्यासाठी सहा मुलभूत प्रश्नांवर चर्चा केली आहे : तो प्रभावीपणे शिकवू शकतो का? तो पात्र आहे का? त्याचे ईश्वरी सिद्धांताचे ज्ञान योग्य आहे का? त्याचे आचरण त्याच्या सिद्धांताशी जुळणारे आहे का? आणि मंडळीने असा माणूस कसा शोधावा? ज्यांना उपदेश आणि मेषपालत्वाच्या इतर जबाबदाऱ्या यांमध्ये समतोल साधायचा आहे अशा शोध समित्या, मंडळीचे पुढारी, पाळक आणि पाळकाची भूमिका काय हे जाणू इच्छिणाऱ्या सर्वांनाच ब्रायन बीडबाक यांच्या स्पष्ट लिखाणाद्वारे मदत होईल.

Tags: ,

100.00

Availability:

Out of stock

Description

(२९७ पाने)

“ब्रायनने अशी साधन निर्मिती केली आहे की पुढील काळासाठी मंडळ्यांना त्याची अतिशय मदत होईल.”
जॉन मॅकआर्थर; पाळक-शिक्षक, ग्रेस कम्युनिटी चर्च, सन व्हॅली कॅलीफोर्निया यू. एस. ए.

“हे पुस्तक सखोल मसलतींनी भरलेले आहे आणि पाळकाचा शोध घेणाऱ्या मंडळ्यांना ते भरीव प्रकारची मदत करते. बराच काळ अशा गरजेची पोकळी होती. ब्रायन बीडबाचे हे पुस्तक ती भरून काढते.”
फिल जॉन्सन; एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर ग्रेस टू यू, साऊथ कॅलिफोर्निया यू. एस. ए . आंतरराष्ट्रीय परिषदांचे प्रख्यात वक्ते आणि व्याख्याते

“या पुस्तकाद्वारे ब्रायन बीडबा यांनी मंडळीची प्रचंड प्रमाणात सेवा केली आहे.”
वेन मॅक, आंतरराष्ट्रीय प्रसिध्द लेखक आणि वक्ते. सध्या ग्रेस स्कूल ऑफ मिनिस्ट्री इन प्रिटोरिया, साऊथ आफ्रिका, येथे शिकवतात

ब्रायन बीडबाक हे कॅलीफोर्निया-च्या सील बीच कडचे आहेत ते अपलँडच्या टेलर युनिव्ह-र्सिटीचे आणि लॉस एंजेलिस येथील मास्टर्स सेमिनरीचे पदवीधर आहेत. ते आणि त्यांची पत्नी अनिता यांना चार मुले आहेत. ब्रायन यांनी प्रथम बरेच वर्षे आंतरराष्ट्रीय ख्रिस्ती संस्थेत काम केले.

आफ्रिकेत सेवा करीत असताना तेथील मंडळीची दुर्बल अवस्था पाहून ब्रायन यांना मंडळीरोपण व तिची उभारणी करण्यासाठी ओझे आले. १९९९ पासून ब्रायन हे पूर्णवेळ पाळक आहेत. सध्या ते एका आफ्रिकन बायबल कॉलेजमध्ये शिकवतात तसेच मलावी तेथील लीलॉन्ग्वे येथे आंतरराष्ट्रीय मंडळी स्थापन करीत आहेत.