जेव्हा रोगनिवारण होत नाही
लेखक: जॉन मॅकआर्थर
अनुवादः डॉ. संजय आठवले
ख्रिस्ती व्यक्तीचा दृष्टिकोन योग्य असेल तर कोणतीही परीक्षा त्याच्यासाठी आनंददायी अनुभव होऊ शकतो. खरं तर परीक्षा या देवावर अवलंबून राहाण्यासाठी व शहाणपणात वाढण्यासाठी देवाकडून परवानगी मिळालेल्या संधी आहेत.
याकोब १ः २ ते १२ मध्ये याकोब या परीक्षांची कारणे, परीक्षांना द्यावयाचे योग्य प्रतिसाद आणि परीक्षांचे परिणाम यांवर चर्चा करतो. पुढे याकोबाच्या पाचव्या अध्यायात आपण वाचतो , “तुम्हांमध्ये कोणी दुःख भोगीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी… कोणी दुखणाईत आहे काय?… तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा” (वचने १३ ते १६).
याकोब कोणत्या प्रकारच्या दुःख व आजाराविषयी बोलत आहे? जेव्हा रोगनिवारण होत नाही यामध्ये याची उत्तरे शोधा व अशा कठीण समस्यांमध्ये कसे टिकून रहावे हे समजून घ्या.
₹10.00
Out of stock
Description
(४३ पाने)
जॉन मॅकआर्थर हे सन व्हॅली कॅलिफोर्निया येथील ग्रेस कम्युनिटी चर्चचे पाळक आहेत. ते पवित्र शास्त्राचे निरुपणकार , अनेक सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. द मास्टर्स कॉलेज अॅन्ड सेमिनरीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे ध्वनिफितींच्या द्वारे होणारे सेवाकार्य आणि ?ग्रेस टू यू? हा आकाशवाणीवरील रोजचा कार्य्क्राम आंतरराष्ट्रीय स्तरावरील लक्षावधी लोकांपर्यंत पोचत आहे.
Additional information
Weight | 40 g |
---|---|
Language | मराठी |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.