0

उलगडात्मक संदेश

लेखक: स्टीव्हन ए क्रेलॉफ
अनुवाद: क्रॉसी उर्टेकर

बायबलनुसार असलेला सेवेचा असलेला नमुना अनुसरू इच्छिणाऱ्या पाळकांना हे पुस्तक मोलाची मदत पुरवते. मुलभूत गोष्टींपासून सुरुवात करून सर्व आवश्यक गोष्टींची स्पष्ट माहिती देऊन पास्टर क्रेलॉफ यांनी उलगडात्मक संदेशासाठी एक सुरेख हस्तपुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. हे प्रसिद्ध होत असल्याचे पाहून मला धन्य वाटते. जेथे अशी साधने सहज उपलब्ध होणे कठीण आहे आणि बायबलवर आधारित संदेशांविषयी लक्षणीय भूक आहे अशा भारतात हे प्रथम उपलब्ध होत आहे हे पाहून मला आनंद वाटतो.

माझी खात्री आहे की जर अधिकाधिक पाळकवर्ग २ तीम.४:२ चे मनापासून अनुकरण करतील तर आपण मंडळीची संख्येने वाढ झाल्याचे तर पाहूच पण (अधिक महत्त्वाचे म्हणजे) मंडळीचे आध्यात्मिक सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढलेले पाहू. माझी ही देखील खात्री आहे की, मंडळीच्या रोगावर उपाय करून तिला ख्रिस्ताकडे वळवण्यासाठी, तसेच भारत किंवा इतर कोणत्याही राष्ट्राला ख्रिस्ताकडे आणण्याचे एकच साधन आहे ते म्हणजे “बायबलनुसार संदेश.”

माझी प्रार्थना हीच आहे की जे हे काम वाचतील त्यांना पास्टर क्रेलॉफ ची तळमळ प्राप्त व्हावी आणि त्यांनी नव्या जोमाने २ तीम. ४:२ मधील श्रेष्ठ पाचारणासाठी स्वत:ला वाहून घ्यावे.

– जॉन मॅकआर्थर

Tags: ,

100.00

Availability:

Out of stock

Description

(१२५ पाने)

स्टीव्ह क्रेलॉफ हे फ्लोरिडातील क्लियरवॉटर येथील लेकसाईड कम्युनिटी चॅपलचे १९८१ पासून पाळक/शिक्षक आहेत. स्टीव्ह हे यहूदी ख्रिस्ती आहेत. दक्षिण फ्लोरिडा येथे विद्यापिठात विद्यार्थी असताना त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. ते मूडी बायबल इन्स्टिट्यूट व टॅम्पा बे थिओलोजिकल सेमिनरीचे पदवीधर आहेत. God’s plan for Israel रोम ९-११ अध्यायावर अभ्यास व Expository preaching ह्या दोन पुस्तकांचे ते लेखक आहेत. Israel my Glory; Masterpiece, Israel’s Hope , Journal of Modern Ministry अशा अनेक मासिके व नियतकालिकांतून त्यांनी लिखाण केले आहे. अमेरिकेत व इतर देशांत त्यांनी मंडळीसाठी नेतृत्व प्रशिक्षण देण्यात सहभाग घेतला आहे. एकेका वचनावर रेडिओद्वारे शिक्षण या कार्यक्रमाचे ते शिक्षक आहेत. स्टीव्ह आणि त्यांची पत्नी मिशेल यांच्या विवाहाला ३५हून अधिक वर्षे लोटली असून त्यांना तीन मुले व अनेक नातवंडे आहेत.

Additional information

Weight 168 g
Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उलगडात्मक संदेश”

Your email address will not be published. Required fields are marked *