Catalogue
“Discernment (Malayalam)” has been added to your cart. View cart
“Discernment (Malayalam)” has been added to your cart. View cart
एकदा तारलात की कायमचे बदललात
₹20.00
लेखक: स्टीव्ह फर्नांडिस (1948-2013)
अनुवाद: क्रॉसी उर्टेकर
नव्याने जन्म होणे याचा अर्थ काय?
आजच्या आपल्या पिढीमध्ये पुनर्जीवन याच्या अर्थाबाबत बराच गैरसमज आहे. हा गैरसमज सुवार्तावादी मंडळ्यांतही मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अशा समजाने बायबलमध्ये असलेला पुनर्जीवनाचा अर्थ इतका कमकुवत व निरस केला गेला आहे की कायमस्वरूपी बदल न होता व भक्कम आध्यात्मिक पुरावा नसतानाही लोकांना “नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती” असे समजण्यात येते. याच्या परिणामाने देवाच्या मूलभूत नवीकरणाच्या कार्याची किंमत कमी केली जाते.
आपल्या स्पष्ट व संक्षिप्त अभ्यासात नवीन जन्म म्हणजे काय याचा आवश्यक गुणधर्म समजून घेण्यास पास्टर स्टीव्ह फर्नांडिस यांनी मदत केली आहे. यामध्ये व्यक्तीच्या गाभ्याचा कल आणि स्वभाव संपूर्ण बदलला जातो. त्यामुळे व्यक्तीचे तिच्या वृत्तीमध्ये व आचरणात मूलभूत रूपांतर होते- एकदा तारलात की कायमचे बदललात!
Out of stock
Description
(५३ पाने)
स्टीव्ह फर्नांडिस हे कॅलिफोर्नियातील वलेहो येथील कम्युनिटी बायबल चर्च चे जेष्ठ पाळक होते. या चर्च ची स्थापना त्यांनी १९८० मध्ये केली. ह्या मंडळीची सुरुवात २५ सभासदांसमवेत झाली आणि त्यांचा आठवड्यातून एकदा बायबल अभ्यास होत असे. उलगडात्मक उपदेश, शिष्यत्व आणि मिशनरी कार्य यावर केंद्रित असलेल्या या मंडळीची देवाने वाढ केली व सभासदांची संख्या १००० वर गेली. वलेहो येथे येण्यापूर्वी स्टीव्ह यांनी कॅलिफोर्नियाच्या हर्क्युलस येथील व्हॅली बायबल चर्च येथे सहाय्यक पाळक म्हणून चार वर्षे सेवा केली.
वलेहो येथील कॉर्नरस्टोन सेमिनरीचे स्टीव्ह हे संस्थापक व अध्यक्ष होते. येथे त्यांनी मिशन्स, उपदेशाचे ईश्वरज्ञान, उपदेश करणे हे विषय शिकवले. स्टीव्ह हे कॅलिफोर्निया मधील प्लेझेंट हिलच्या ग्रेस स्कूल ऑफ थिओलॉजी अॅन्ड मिनिस्ट्री चे सह-संस्थापक, विश्वस्त व अध्यापक होते. येथे त्यांनी पद्धतशीर ईश्वरज्ञान, बायबलचा उलगडा आणि उपदेश हे विषय २५ वर्षे शिकवले. भारत, अग्नेय आशिया, आफ्रिका, युरोप, मध्य अमेरिका आणि फिलिपाईन्स येथे त्यांनी पाळकीय परिषदांमध्ये उपदेश केले व शिकवले. कॅलिफोर्नियाच्या हेवर्ड युनिव्हर्सिटीचे तसेच डॅलस थिओलॉजिकल सेमिनरीचे ते पदवीधर होते. त्यांनी अनेक पुस्तके व पुस्तिका व अभ्यासाचे साहित्य लिहिले. यामध्ये फ्री जस्टीफिकेशन: पापी लोकांना नीतिमान करण्यामध्ये ख्रिस्ताचा गौरव; येशू आणि खिन्न जन; एकदा तारलात की कायमचे बदललात; ख्राईस्टस् इनफायनाईट फुलनेस आणि इलेक्शन: देवाची त्याच्या लोकांसाठी असलेली न बदलणारी प्रीती यांचा समावेश होतो. ३-३-२०१३ या पुनरुत्थान दिनाच्या संध्याकाळी स्टीव्ह यांना प्रभूने आपल्या घरी बोलावले.
Additional information
Weight | 66 g |
---|---|
Language | मराठी |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Product categories
Discounted Books
-
Ashamed of the Gospel: When the Church Becomes Like the World
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. -
Grace for Today: Daily Readings from the Life of Christ Vol. II
₹300.00Original price was: ₹300.00.₹200.00Current price is: ₹200.00. -
Grace for Today: Daily Readings from the Life of Christ Vol. III
₹300.00Original price was: ₹300.00.₹200.00Current price is: ₹200.00. -
-
Grace for Today: Daily Readings from the Life of Christ Vol. I
₹300.00Original price was: ₹300.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Featured Products
-
How to Study the Bible ₹150.00
-
-
Essential Christian Doctrine - A Handbook on Biblical Truth HARDCOVERRated 5.00 out of 5
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
11 Book SET for Disciple Making: Fundamentals of the Faith
₹1,200.00Original price was: ₹1,200.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
Reviews
There are no reviews yet.