SKU: KSMAR ,

ख्रिस्ती शिष्यत्व

लेखक: विल्यम मॅकडॉनल्ड

खरे शिष्यत्व हे येशू ख्रिस्ताला संपूर्ण समर्पण आहे.  संध्याकाळच्या आपल्या फावल्या वेळा, फावले शनिवार, रविवार, आपल्या निवृत्तीनंतरचा काळ त्याला देतील असे स्त्री?पुरुष येशूला नको आहेत. परंतु जे आपल्या
जीवनामध्ये त्याला प्रथम स्थान देतील अशांना तो शोधत आहे.

त्याच्या कालवरीच्या समर्पणाला बिनशर्त शरण जाणे याशिवाय दुसरा कोणताही प्रतिसाद त्याच्यासाठी योग्य ठरणार नाही.

टीकेखोर जग पाहत आहे. एका कुठल्यातरी अनोख्या उपजत स्वभावातून ते नक्की समजून घेते की, ख्रिस्ती जीवन एक तर सर्वस्वासाठी नाहीतर शून्यासाठी पात्र आहे. जग जेव्हा एखादा खराखुरा ख्रिस्ती पाहाते तेव्हा ते
कदाचित टोमणे मारील, थ?ा करील; परंतु तरीही ख्रिस्तासाठी बेफिकीरपणे स्वतःचा त्याग करणाऱ्या व्यक्तीला ते आपल्या मनात खोलवर मान देते. पण अर्धवट  अंतःकरणाचा ख्रिस्ती जग जेव्हा पाहाते तेव्हा जगाजवळ त्याच्यासाठी तिरस्काराशिवाय दुसरे काहीच नसते.

ख्रिस्ताला अनुसरण्याचा जो कोणी निश्र्चय करतो त्याने गेथशेमेनी, गुलगुथा व गब्बाथा यांची आठवण ठेवावी आणि नंतर त्याने लागणारी किंमत मोजावी. ते एकतर ख्रिस्ताशी पूर्णपणे वचनबद्ध होणे असेल किंवा कलंक व मानहानी
दर्शविणारे कुरकुर करीत समर्पण असेल.

येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य होणे म्हणजे त्याचा बंदीवान दास होणे व त्याची सेवा हेच पूर्ण स्वातंत्र्य आहे हे ओळखून घेणे.

Tags: ,

20.00

Availability:

Out of stock

Description

(८२ पाने)